लासुर्णे : बोरी (ता. इंदापूर) गावातील 32 वर्षीय फळविक्रेता युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. या युवकाच्या संपर्कात आलेल्या काटेवाडी (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरसह 6 कर्मचारी, इतर 10 जणांचा समावेश आहे.
बोरी मधील हा फळविक्रेता फळांच्या विक्रीसाठी पुणे व मुंबईला नियमित ये- जा करीत होता. तो आजारी असल्याने काटेवाडी (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व बारामतीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. त्याने रूई येथील कोविड सेंटरमध्ये तपासणी केली असता त्याचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आरोग्य विभागाने तातडीने युवकांच्या संपर्कामध्ये आलेल्या नागरिकांचा शोध घेतला. बोरी गावातील व कुटुंबातील 10 व्यक्तींचा व काटेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह 6 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.