राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नित्य गोपाळ दास यांना करोना

नवी दिल्ली – राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नित्य गोपाळ दास यांना करोनाची लागण झाली आहे. मथुरामधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे.

माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे महंत नित्य गोपाळ दास दहीहंडीनिमित्त मथुरेत आले होते. यावेळी त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने तातडीने सीताराम आश्रमात दाखल करण्यात आले असून करोनाची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

महत्वाचे म्हणजे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत महंत नित्य गोपाळ दासही उपस्थित होते. सोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचलाक मोहन भागवत आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या. सात दिवसांनंतर आता महंत नित्य गोपाळ दास यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने  खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.