राजस्थान रॉयलच्या प्रशिक्षकांना करोना

जयपूर – आयपीएल स्पर्धेसाठी अमिरातीला जाण्याच्या तयारीत असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक यांना करोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या अमिरातीत जाण्याच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

याग्निक हे संघाच्या सराव शिबिरातही उपस्थित राहिले होते त्यामुळे शिबिरातील सहभागी सर्व खेळाडूंचीही करोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. आता पुढील कार्यवाहीसाठी बीसीसीआय कोणते पाऊल उचलणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.