भिवंडी- राज्यात करोनाचा फैलाव वाढत चालला आहे. भिवंडी लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. कपिल पाटील यांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, सून, पुतण्या यांसह एकूण आठ जणांना करोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीा करोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.