नवी दिल्ली – टोयोटा कंपनीच्या कर्नाटकमधील बिदाडी येथील कारखान्यातील दोन कामगारांना करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. कंपनीने शेअरबाजारांना ही माहिती दिली आहे.
कंपनीने 26 मे रोजी या कारखान्यातील काम सुरू केले होते. मात्र, दरम्यानच्या काळामध्ये सर्व कामगारांची अरोग्यविषयक तपासणी केली असता त्यातील 2 कामगारांना करोना झाला असल्याचे आढळून आले आहे. त्या कामगारावर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत. इतरही कामगारांची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. या कारणामुळे काल कंपनीचे कामकाज सॅनिटायझेशनसाठी थांबवण्यात आले होते. मात्र, आता कामकाज सुरू करण्यात आले असल्याचे कंपनीने शेअरबाजारांना सांगितले आहे.