करोना ‘काळ’वर्ष’: जगणं… अनलॉक!

टीम प्रभात

पुणे – करोना…कोरोना…कोविड…कोविड-19 यांपैकी काहीही म्हणा…पण, या विषाणूनं गेल्या वर्षभरात आपल्या मानगुटीवर बस्तान बसवलं. राज्यातला करोनाचा पहिला बाधित पुण्यात 9 मार्च 2020 रोजी सापडला आणि सगळ्यांच्याच छातीत धडधड झालं. पीपीई किट परिधान करून उपचार करणारे डॉक्‍टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ टीव्ही-वर्तमानपत्रांतून दिसत होती. पण, ही धाकधूक पुणेकर आता प्रत्यक्ष अनुभवू लागले. रस्त्यावरून सायरन वाजवत जाणाऱ्या ऍम्ब्युलन्सचा आवाज ऐकून काळजात धस्स व्हायचं…अर्थात अजूनही होतंय…

तर, “पलिकडच्या गल्लीत कोणीतरी पॉझिटिव्ह सापडला’ हे वाक्‍य कानी येताच आपण आपला मास्क आणखी घट्ट करायचो… लेकरा-बाळांना कडेवर घेऊन अनवाणी चालणारे श्रमिकांचे जत्थे विचार करायला लावणारे होते..गुढीपाडवा, गणेशोत्सव तर घरातच गेला…बाप्पांचं विसर्जन घरातल्या बादलीत करताना अनेकांना गलबलून आलं…पण, काय करणार? सगळेच हतबल होतो.

करोनापेक्षा भयंकर ठरलेल्या लॉकडाऊनच्या संकटात हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. दुकानं बंद झाली…उलाढाल ठप्प झाली…घरात पैसाही येईनासा झाला..अन्नधान्य मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी, मजूर, वृद्घ, दिव्यांग नागरिक या सर्वांनाच कोणी ना कोणी आधार दिला.

येथून माणूसकी जिवंत असल्याचं दिसलं…
पुढे दिवाळी आली करोनाचं संकट काहीसं हलकं झालं..रुग्ण कमी झाल्याचं ऐकू येऊ लागलं आणि त्यामुळं हायसं वाटलं.. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली अन्‌ बाजार बहरू लागला….थबकलेली पावलं पुन्हा सावरू लागली…लॉकडाऊनमध्ये घरातच बांधलेले कष्टकऱ्यांचे हात असो, की रिक्षांची चाकं…पुन्हा श्रमू-कष्टू लागली आणि चिल्यापिल्यांच्या चोचीत दाणा भरवू लागली….करोनानं आपल्याला थांबवलं होतं…स्तब्ध केलं होतं…पण, त्यानंतर आता पुन्हा आपण सावरलोय…पुन्हा धडपडतोय.. कष्टानं उभं राहतोय…यातच आनंदवार्ता म्हणजे…करोनाला रोखणारी लस आली…

आणि एक नाही, तर दोन-दोन लसी आपल्या वैज्ञानिकांनी तयार केल्या…आता करोनाचे बाधित वाढत असले, तरी लस असल्याने पूर्वीच्या तुलनेत भीती काहीशी कमी झाली आहे. पण, धोका टळलाय असं नाही. मास्क वापरणं, स्वच्छता ठेवणं आणि गर्दीपासून दूर थांबत सुरक्षित अंतर ठेवणं आता आपण शिकलोय…गर्दी झाली, की करोना पाय पसरतो..पण, तीच गर्दी जेव्हा एकतेची वज्रमुठ करते आणि सुरक्षेचे शस्त्र बाळगते तेव्हा करोना आपल्याकडे फिरकतही नाही…डॉक्‍टर्स, हेल्थवर्कर्स, स्वच्छता कर्मचारी, पालिका कर्मचारी, जिल्हा प्रशासन यांनी आपल्याला संजीवनी दिली..आता निर्बंध असले, तरी आपलं जगणं मात्र “अनलॉक’ झालंय, हे मात्र नक्‍की…

करोना काळ’वर्ष’: स्मशानभूमी व्यवस्थापन आणि शीतपेट्यांची आयडिया

करोना काळ’वर्ष’: रुग्णालयांची तारेवरची कसरत

करोना काळ’वर्ष’ : अन्‌…आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली

करोना काळ’वर्ष’: …आणि रुग्णसेवेसाठी रेल्वे धावली

करोना काळ’वर्ष’ : हॉटेल व्यावसायिकांची अजूनही सावरण्याची धडपड

श्रमिकांची पावले पुन्हा कर्मभूमीकडे…
करोना ‘काळ’वर्ष’: ऑनलाइन शिक्षणाचा नवा “धडा’…
करोना ‘काळ’वर्ष : “जम्बो’चा निर्णय….पण, उशिरानेच!

करोना ‘काळ’वर्ष : “रेमडेसिविर’ची “लाख’मोलाने विक्री
करोना ‘काळ’वर्ष : सांस्कृतिक कार्यक्रमांवर “पडदा’
करोना ‘काळ’वर्ष : “लालपरी’ला मिळाली आर्थिक बळकटी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.