दिलासादायक ! आता देशात येणार नाही करोनाची तिसरी लाट; करोना आता महामारी राहिला नाही

नवी दिल्ली – गेल्या दोन वर्षापासून देशभरात करोना महामारीने थैमान घातले आहे. देशात करोनाची दुसरी लाट कमी झाली असून करोना रुग्णांमध्ये आता कमालीची घट झाली आहे. असे असाताना तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी दिला होता. मात्र आता करोना विषाणू महामारी राहिला नसल्याचे दिल्लीच्या एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे. ही सर्वासांठी दिलासादायक बातमी आहे.

डॉक्टर रणदीप गुलेरिया म्हणाले की, करोना व्हायरस आता महामारी राहिला नाही. पण जोपर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होत नाही तोपर्यंत अत्यंत सावध आणि सतर्क असणे गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

देशातील सर्व लोकांना कोरोना लस देणे हे अत्यंत गरजेचे आहे. काही लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता भासू शकते. पण यावर निर्णय घेतला जाईल. सर्वात आधी सर्वांनी लस घेतली पाहिजे त्यानंतर बूस्टर डोसचा विषय येईल. डिसेंबरपर्यंत सर्वांना लस देण्याचं लक्ष्य असल्याचं डॉक्टर गुलेरिया म्हणाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.