Corona : दिवाळीनंतर रूग्णसंख्या वाढण्याची शक्‍यता

नाशिक –  राज्यात सध्या करोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. करोना प्रतिबंधक नियम पाळले नाही तर रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

टोपे यांनी दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढण्याची शक्‍यता वर्तवली आहे. तसेच टास्क फोर्सने तसा अंदाज व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ते नाशिकमध्ये माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलत होते. सध्या कोठेही तिसऱ्या लाटेची सुरुवात नाही. मात्र, दिवाळीनंतर रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

सध्या रुग्णसंख्या कमी झालेली आहे. पॉझिटिव्हीटी दर कमी झालेला आहे. तसेच सध्या करोना चाचणीसुद्धा कमी केलेल्या नाहीयेत,असे राजेश टोपे म्हणाले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.