Corona : सक्रिय बाधितांची संख्या धडकी भरवणारी! एकट्या पुणे जिल्ह्यात…

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – पुणे विभागातील सक्रिय बाधित संख्या 1 लाख 41 हजार 113 वर पोहचली आहे. त्यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्यातील सक्रिय बाधित संख्या ही 1 लाख 1 हजार आहे. तर अन्य चार जिल्ह्यातील सक्रिय बाधित संख्या ही 40 हजार आहे. विभागामध्ये दररोज 15 ते 19 हजार बाधित सापडत असल्यामुळे मागील दहा दिवसात बाधित संख्येने दहा लाखाचा टप्पा पार केला आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे करोनामुक्तीचा वेगही मंदावला आहे.

पुणे विभागातील 10 लाख 31 हजार 411 बाधितांपैकी 8 लाख 70 हजार 437 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकुण 19 हजार 861 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.93 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.39 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. त्यामध्ये पुणे जिल्हातील 7 लाख 42 हजार 451 बाधितांपैकी 6 लाख 29 हजार 205 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 1 हजार 691 तर 11 हजार 555 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील 84 हजार 738 बाधितांपैकी 67 हजार 498 रुग्ण बरे झाले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 208 तर 2 हजार 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 82 हजार 462 बाधितांपैकी 68 हजार 768 रुग्ण बरे होवून घरी गेले. 11 हजार 328 सक्रिय बाधित असून, 2 हजार 366 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील 63 हजार 177 बाधितांपैकी 52 हजार 877 बाधित बरे झाले आहेत. 8 हजार 331 बाधित उपचार घेत असून आतापर्यंत 1 हजार 969 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 58 हजार 583 बाधितांपैकी 52 हजार 89 रुग्ण बरे झाले आहेत. 4 हजार 555 सक्रिय बाधित 1 हजार 939 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात नवीन 15 हजार बाधित तर 13 हजार करोनामुक्त

गेल्या 24 तासात पुणे विभागात 15 हजार 347 नवीन बाधित सापडले. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 10 हजार 393, सातारा हजार 1 हजार 571, सोलापूर 1 हजार 461, सांगली 1 हजार 90 तर कोल्हापूर 832 बाधित सापडले. तर 13 हजार 107 बाधित करोनामुक्त झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.