बिहारच्या मुख्य सचिवाचेच कोरोनाने निधन

पाटणा : बिहारचे मुख्य सचिव अरूण कुमार सिंह यांचे आज येथील एका खासगी रूग्णालयात कोरोनाने निधन झाल्याचे वृत्त आहे. त्यांना कोरोना झाल्याचे निदान नुकतेच झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर पाटण्यातील पारस रूग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांचे निधन झाले.

केवळ 2 महिन्यांपुर्वीच म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी अरूणकुमारसिंह यांची मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली होती. ते 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांचा अवधीही कमीच राहिला होता. नियोजित सेवाशर्तीनुसार येत्या ऑगस्ट महिन्यात ते निवृत्त होणार होते. पण त्याच्या आतच त्यांना मृत्यूने गाठले आहे.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या निधनाची बातमी नमूद करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. राज्याच्या मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याचेच कोरोनाने निधन झाल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.