देशभरात सध्या 2400 प्रयोगशाळांमध्ये करोना चाचण्या; एकूण 21 कोटी चाचण्यांचा टप्पा गाठला

नवी दिल्ली – आज देशभरातील चाचण्यांच्या संख्येने 21 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज देशात एकूण 2393 चाचणी प्रयोगशाळा असून त्यात 1,220 सरकारी आणि 1,173 खाजगी प्रयोगशाळा आहेत. सध्या देशात, राष्ट्रीय स्तरावर रुग्ण पॉझिटिव्ह असण्याचा दर 5.20 टक्के झाला आहे. आजपर्यंत 1,11,16,854 लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्यात आली आहे.

भारतात आतापर्यंत एकूण 1.06 कोटी रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के इतका आहे. केरळमध्ये एका दिवसांत 4,345 रुग्ण बरे झाले तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,417 इतकी आणि तमिळनाडू मध्ये 460 इतकी आहे.

सध्या देशात, एकूण 1.50 लाख सक्रीय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आजही सर्वाधिक रुग्ण असून गेल्या 24 तासांत 6,971 रुग्ण आढळले. त्या खालोखाल 4,070 रुग्ण केरळमध्ये तर 452 रुग्ण तामिळनाडू मध्ये आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात एकूण 83 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 35 तर केरळमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.