कोरोना चाचणी आता एवढ्या रुपयांमध्ये होणार!

मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि टेस्ट माफक दरात करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु होते.  आरोग्य विभागाने दखल घेत आता कोरोना चाचणीचे दर कमी करण्यात आले आहे. चाचणीचा नवा दर 1200 रुपये करण्यात आला आहे.

कोरोना संख्येत भारताने आता ब्राझिलची बरोबरी केली आहे. मार्च महिन्यात किंवा सुरुवातीच्या काळात भारत बाराव्या क्रमांकावर होता. मात्र आता भारत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारतात कोरोना बाधितांचा आकडा सतत नवा उच्चांक गाठत आहे. त्यामुळे भारतात हा आकडा आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे सगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु आहे. त्यातच कोरोना चाचणीचा दर कमी करणे हे महत्वाचं पाऊल ठरु शकतं.

सुरुवातीच्या काळात राज्यात कोरोना टेस्टसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. या तक्रारींनंतर कोरोनाचे दर 4,500 हजार रुपयांच्या घरात आणण्यात आले. नंतर हेच दर 2,400 ते 2,800 रुपये करण्यात आले. आता हे दर 1.200 रुपयांवर आणण्यात आले आहेत.

डॉ. सुधाकर शिंदे यांनी सादर केलेल्या अहवालात हा चाचणी दर आणखीही कमी होऊ शकतो असे नमूद करण्यात आले होते. यासाठी केंद्र सरकारने या चाचणीसाठी लागणार्या रिएजंटस् वरील जीएसटी व आयात कर माफ केल्यास हे दर निश्चित कमी होतील असे स्पष्ट केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.