सांगली – येथील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या १२ जणांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली असून यामुळं राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे ही माहिती देण्यात आली असून ‘कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आलेले सर्व १२ रुग्ण हे इतर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आले होते.’ असं देखील स्पष्ट करण्यात आलंय.
12 more people (contacts of earlier positive cases) test positive for Coronavirus in Sangli; Till now, there are 147 positive cases in Maharashtra: PRO, Maharashtra Health Department pic.twitter.com/u8Poc8xhGY
— ANI (@ANI) March 27, 2020
दरम्यान, आज सकाळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुकद्वारे नागरिकांशी संवाद साधताना राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १३५ असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता या संख्येमध्ये १२ रुग्णांची वाढ झाली असून महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १४७ वर पोहोचला आहे.