पुणे : कोरोना विषाणूची लागण झालेली संशयित महिला पिंपरी चिंचवडमध्ये आढळली आहे. हि महिला दुबईहून 27 फेब्रुवारीला पुण्यात परतली होती. या महिलेला उपचारस्ताही पुण्याच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोणाची लक्षणं आढळून आल्यानंतर महिलेसोबतच तिच्या कुटुंबालादेसखील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यातील एका दाम्पत्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सोमवारी स्पष्ट झालं होत. त्यानंतर सर्वाना नायडू रुग्णालयातील विलीगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची वैद्यकीय नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.
दरम्यान कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या पाच झाली असून त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत.