105 जणांना डिस्चार्ज
335 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा – जिल्ह्यातील चार करोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी बुधवारी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या 1779 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील 105 जणांना आज डिस्चार्ज दिला असून 335 जणांचे नमुने तपासणीला पाठवले आहेत.
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येथील करंजे पेठेतील 65 वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये कृष्णानगर ता. सातारा येथील 81 वर्षीय पुरुष, खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, बोरखळ ता. सातारा येथील 77 वर्षीय पुरुष अशा एकूण चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून बुधवारी संध्याकाळपर्यंत 105 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 335 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 23, कराड 30, फलटण 7, कोरेगाव 6, वाई 7, खंडाळा 7, रायगाव 36, पानमळेवाडी 134, महाबळेश्वर 7, तळमावले 20, तरडगाव 3 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 95 अशा एकूण 335 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
एकूण नमुने -269840
एकूण बाधित -53744
घरी सोडण्यात आलेले -50611
मृत्यू -1779
उपचारार्थ रुग्ण -1354