‘कोरोना हवेतून पसरतो सहा फुटांचे अंतरही सुरक्षित नाही’;अमेरिकेमध्ये नागरिकांसाठी नवीन गाईडलाईन जारी

वाशिंग्टन – जगात कोरोना महामारी येऊन जवळपास एक वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला गेला आहे. विविध तज्ञ कोरोना महामारी कशी आली याचा अभ्यास करत आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस हवेतून पसरु शकत असल्याचा दावा केला होता.

तर  आता  अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शन (सीडीसी) ने यावर मोठा खुलासा केला आहे. कोरोना हा हवेतून एकाकडून दुसऱ्याला संक्रमित करू शकतो. श्वास सोडताना नाकावाटे किंवा तोंडावाटे निघणाऱ्या अतिसूक्ष्म कणांद्वारे तो हवेतून पसरण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे.

सीडीसीने अमेरिकेमध्ये नागरिकांसाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे लॅन्सेट जर्नलमध्ये एक संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर साधारण महिनाभराने सीडीसीच्या या नवीन गाईडलाईन आल्या आहेत. लॅन्सेटमध्ये कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याचे म्हटले होते. कोरोना हवेतून पसरत असल्याचे अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाच्या सहा शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे तर हा आजार हवेतून पसरत नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

या नवीन गाईडलाईननुसार, सीडीसीने काही परिस्थितीमध्ये सहा फुटांचे अंतरही सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. जर कोरोनाबाधित रुग्ण 15 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त काळ एखाद्या घरात किंवा खोलीत असेल तर त्याच्या श्वासातून बाहेर पडलेला कोरोना व्हायरस हवेतच राहतो आणि अशा परिस्थितीत सहा फुटांपेक्षा जास्त अंतर असलेल्या व्यक्तीलाही कोरोनाची बाधा होऊ शकते. अन्य खुल्या जागांवर सहा फुटांचे अंतर सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.