देशातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर! ‘या’ शहरांमध्ये नाईट कर्फ्यूसह लॉकडाऊनचे आदेश

नवी दिल्ली : देशभरात रोज कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. देशात कोरोनची परिस्थिती गंभीर होत असतानाच अनेक शहरे, जिल्हे आणि राज्यांमध्ये लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचे आदेश देण्यात आले आहेत. मागील 24 तासांच देशात अनेक ठिकाणी कोरोना नियम आणखी कठोर झाल्याचे दिसत आहे.

उत्तर प्रदेशात कोरोनाचा वाढता धोका पाहता गाजियाबाद, बरेली, मेरठ, नोएडा या भागात जिल्हा प्रशासनाने कर्फ्यूचे निर्देश दिले आहेत. बरेलीमध्ये 20 एप्रिलपर्यंत रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हे निर्देश लागू असतील. गाजियाबादमध्ये 17 एप्रिलपर्यंत रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू सुरु असेल. तर मेरठमध्येही 18 एप्रिलपर्यंत कर्फ्यू लागू असेल. या ठिकाणांपूर्वी प्रयागराज, लखनौ, वाराणासी या भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला होता.

मध्य प्रदेशातील 5 जिल्ह्यांमध्ये जवळपास 7-9 दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भोपाळमधील कोलार क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून 9 दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. याव्यतिरिक्त रतलाम, बैतूल, कटनी, खरगोन आणि छिंदवाडा या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्याम, महाराष्ट्रातही काही वेगळी परिथिती नाही. राज्यातही विकेंड लॉक डाऊन आणि नाईट कर्फ्यूचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगरसह आठ जिल्ह्यांतील शहरी भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्याचे निर्देश दिले. हा नाईट कर्फ्यू शुक्रवारपासून सुरु होणार असून, रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लागू असेल. जम्मू, उधमपुर, कठुआ, श्रीनगर, बारामुला, बड़गाम, अनंतनाग आणि कुपवाड़ा, या भागांत हे निर्बंध लागू असतील.

राजस्थानमधील जयपुर, अजमेर, भीलवाड़ा, जोधपुर, कोटा, उदयपुर, सागवाड़ा, कुशलगढ या भागांमध्ये रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असेल. तर, गुजरातमधील 20 शहरांमध्ये रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. यामध्ये सुरत, वडोदरा, राजकोट, जामनगर, भावनगर, जूनागढ़, गांधीनगर, आनंद, नडियाद, मेहसाणा, मोरबी, दाहोद, पाटन, गोधरा, भुज, गांधीधाम, भरूच, सुरेंद्रनगर आणिअमरेलीचा समावेश आहे. छत्तीसगढमधील रायपूर, दुर्ग हे भाग पूर्णपणे लॉकडाऊनच्या निर्बंधांचं पालन करत आहेत. तर, तामिळनाडूमध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू असेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.