बेल्हे (प्रतिनिधी):- बेल्हे येथील किराणा व्यावसायिकाच्या संपर्कातील गुळुंचवाडीच्या महिलेचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.
शनिवारी बेल्हे येथील एका किराणा दुकानदाराचा करोना अहवाल खासगी लॅबमध्ये पाॅझिटिव्ह आला होता. सदर व्यक्तीच्या सानिध्यातील आलेल्या ८ व्यक्तींचे स्वॅब मंगळवार (दि.१४) रोजी लेण्याद्री कोविड सेंटर येथे घेण्यात आले होते. त्या पैकी सात जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहीती बेल्हे येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. बी. थोरात यांनी दिली.