#corona positive : दाक्षिणात्य सुपरस्टार ‘पवन कल्याण’ यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह

मुंबई – मागील काही दिवसांपासून देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात रुग्ण वाढ अधिक आहे. चित्रपटसृष्टीत करोनाने शिरकाव केला असून अनेक कलाकारांना करोनाची लागण होत आहे. मध्यंतरी अभिनेता रणबीर कपूर, मिलिंद सोमण आणि आमिर खानला करोनाची लागण झाली होती. त्यातच आता दाक्षिणात्य सुपरस्टार ‘पवन कल्याण’ यांना सुद्धा करोनाची लागण झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawan Kalyan (@pawankalyan.k)

दरम्यान, पवन कल्याण यांनी करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच पवनने स्वत:ला फार्महाउसवर क्वारंटाइन केले असून सध्या डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहे. काही दिवसांपूर्वी पवन कल्याणने करोना चाचणी केली होती. तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण फुफ्फुसामध्ये इनफेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा पवनची करोना चाचणी करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.