सातारा जिल्ह्यात मृत रुग्णाचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह; बाधितांची तालुकानिहाय माहिती

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा आलेल्या करोनाबाधितांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, जावळी तालुक्यातील बेलवडे येथील म्रुत्यू झालेल्या व्रुद्धाचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे आज पाच करोनाबाधितांच्या म्रुत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत १४ करोना रुग्णांचा म्रुत्यू झाला आहे.

रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार करोनाबाधितांची तालुका व गावनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

वाई तालुका – जांभळी-१, आसले २, वेरुळी १, कोंढावळे -१, किरोंडे -१, वडवली-१, वाई ग्रामीण रुग्णालय-१.

महाबळेश्वर तालुका -देवळी-२, पारुट-३, गोरोशी-१.

जावळी तालुका– तोरणेवाडी-१, बेलवडी- १ (मृत).

खटाव तालुका – बनपूरी -१, वांझोळी-१, डांभेवाडी-२,

सातारा तालुका– वावदरे-१

कराड तालुका – शेणोली स्टेशन -७

दरम्यान, बेलवडे येथील अर्धांगवायू आणि मधुमेह असलेला ६८ वर्षीय पुरुष १९ में रोजी मुंबईवरून आला होता. घरात विलगीकरणात होता. तिथेच चक्कर येऊन पडला, तिथेच मृत्यू झाला. त्याचा स्त्राव घेतला होता. मृत्यू पश्चात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.