शिरूर : शिरूर शहरातील सय्यद बाबा नगर येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 14 पैकी दोन जणांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला असून, बाराजण निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये एका 85 वर्षीय वृद्ध महिलेचा व एका वर्षाच्या मुलीचा समावेश असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे.
पाबळ येथील 47 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये तपासलेल्या 35 पैकी 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले असून, इतर सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यामुळे शिरूर शहरात थोडासा दिलासा मिळाला असून परंतु एका 85 वर्षे वृद्ध महिलेचा व एका वर्षाच्या मुलीचा समावेश असल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिरूर शहरातील सय्यद बाबा नगर या परिसरातील एका 36 वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेले तिच्या कुटुंबातील 14 जणांचा काल कोरोना तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. तिच्या व तिच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेले 57 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. चर तालुक्यातील पाबळ भागातील 21 जणांचे कोरोना तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी एक जणांचा अहवाल पॉझिटिव आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.