बारामती- करोनाची तपासणी करण्यास नकार देणाऱ्या पतीवर विळ्याने हल्ला करण्याची घटना बारामतीत घडली आहे. या संदर्भात पतीच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी या बाबत माहिती दिली.
या संदर्भात गौरी महेश शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पती महेश हिरामण शिंदे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत नमूद केले आहे की, पिंपरीहून पत्नी गौरी आलेली होती, त्यामुळे वैद्यकीय तपासणी करुन घे असे महेश शिंदे यांनी गौरी हिला सांगितले मात्र त्यांनी रागाच्या भरात पतीला लोखंडी विळ्याने मारहाण केली. या भांडणात मध्ये येणाऱ्या सत्यभामा शिंदे यांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.