नवी दिल्ली – देशच्या करोना रिकव्हरी रेटमध्ये पुन्हा किंचित वाढ झाली असून हा दर आता 92 पूर्णांक 97 टक्के इतका झाला आहे. आरोग्य विभागाने कोविडचे जे अपडेट दिले आहेत त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
त्यानुसार गेल्या 24 तासांत देशात करोनाचे एकूण 44 हजार 879 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता 87 लाख 28 हजारांवर गेली आहे. गेल्या 24 तासांत 547 करोना बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या आता 1 लाख 28 हजार 668 इतकी झाली आहे.
आजच्या आकडेवारीनुसार देशातील सध्याची सक्रिय बाधितांची संख्या आता 4 लाख 84 हजार 547 इतकी आहे. दरम्यान, काल दिवसभरात देशात एकूण 11 लाख 39 हजार 230 करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.