करोना रिकव्हरी रेट सुधारला

नवी दिल्ली – केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी चालवलेल्या समन्वयाच्या कार्यामुळे देशातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आता हा दर 62.93 टक्‍के इतका झाला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

देशातील सध्याच्या ऍक्‍टिव्ह केसेसची संख्या 2 लाख 92 हजार 258 इतकी आहे. दरम्यान आज देशातील करोनाग्रस्तांची संख्या 8 लाख 49 हजार 553 इतकी झाली आहे. करोना चाचण्यांचे प्रमाणही वाढले असून रविवारी देशात 2 लाख 80 हजार 151 चाचण्या घेण्यात आल्याची माहितीही आरोग्य मंत्र्यांच्यावतीने देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.