नवी दिल्ली – करोना लसीमुळे केवळ करोनापासूनच नव्हे तर अन्य 21 आजारांपासून संरक्षण मिळत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
जगभरात करोनामुळर जगाचे आर्थचक्रही बिघडले. मात्र, आता करोना लसीकरणाच्या मोहिमेमुळे तो नियंत्रणात येत आहे. व्हॅक्सिन्स वर्क या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेने करोना लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या 20 पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केली.
गर्भाशयाचा कर्करोग, पटकी/कॉलरा, घटसर्प, इबोला, हेप बी, इन्फ्लुएंझा, जपानी एन्सेफलायटीस, गोवर, मेंदुज्वर, गालगुंड, डांग्या खोकला, फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया, पोलिओ, रेबिज, रोटा व्हायरस, गोवर, धनुर्वात, विषमज्वर, कांजण्या आणि पीतज्वर या 21 आजारांपासून संरक्षण होत असल्याचे ट्विट जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.