पुणे – शहरात गेल्या चोवीस तासांत 366 करोनाबाधितांची नोंद झाली असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील तीनजण पुणे हद्दीबाहेरील आहेत.
बाधितांची संख्या 1 लाख 71 हजार 418 झाली असून, 1 लाख 61 हजार 556 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
5,380 रुग्ण ऍक्टिव्ह असून, 429 रुग्ण क्रिटिकल आहेत; तर त्यातील 254 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दिवसभरात 3863 स्वॅबचे नमुने घेण्यात आले.