पुण्यात दिवसभर फिरूनही बेड न मिळाल्याने करोनाबाधित महिलेची आत्महत्या

पुणे – करोना संसर्गाने राज्यात थैमान घातलं असून दररोज रुग्णसंख्या वाढतच आहे. प्रचंड वाढलेल्या रुग्णसंख्येमुळं रुग्णांना वैद्यकीय सुविधा आणि बेड मिळणं कठीण झालं आहे. वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यातच पुण्यात करोनाबाधित एका महिलेने बेड मिळत नसल्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

वारजे भागातील एका महिलेला करोना संसर्ग झाला होता. त्रास सुरू झाल्यानंतर महिलेने सोमवारी पतीसोबत दिवसभर शहरातील अनेक रूग्णालयात फिरून बेडसाठी प्रयत्न केले. मात्र कुठेही बेड मिळाला नाही. त्यातच महिलेचा त्रास अजुनच वाढला. त्यातच इतर आजार असल्यामुळे महिला खूपच अस्वस्थ झाली होती. या तणावात महिलेने जीवन संपविण्याचा मार्ग निवडला.

सोमवारी रात्री जेवण झाल्यावर ती बेडरूममध्ये गेली. पण सकाळी बराच वेळ झाला तरी बाहेर आली नाही. त्यामुळे तिच्या पतीने आत जाऊन पाहिले. त्यावेळी तिने गळफास घेतल्याचं दिसून आलं. पोलिसांनी रूमची पाहणी केली. यावेळी संबधित महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये, मी आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं त्या महिलेनं म्हटलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.