उस्मानाबाद प्रतिनिधी – राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला असून त्याच्यावर उमरग्याच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय कक्षात उपचार सुरु केले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राज गलांडे यांनी दिली आहे
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला असून उमरगा तालुक्यातील हा रुग्ण पॉझिटिव्ह आहे. मात्र त्याची पत्नीचा अहवाल निगेटीव्ह आहे . सदरील रुग्ण हा दिल्ली व पानिपत येथे फिरायला गेला होता व तो 2 दिवसांपूर्वी उमरगा येथे आला होता, त्यांनतर त्याचे स्वॅब नमुने घेतले होते त्यातील त्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
त्याच्यावर उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली.पानिपत मार्गे कोरोनाने उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश केल्याची बाब उघड झाली आहे