थोडासा दिलासा….पुण्यात साेमवारी सापडले ‘इतके’ करोना पॉझिटिव्ह

पुणे  – चोवीस तासांत शहरात 185 करोना बाधितांची नोंद झाली, तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील पाच जण पुण्याबाहेरील आहेत.  दरम्यान, गेल्या आठवड्यात दररोज सरासरी 400 ते 500 नवे बाधित सापडत होते. हा आकडा सोमवारी निम्म्याने कमी झाला आहे. अर्थात त्या तुलनेत चाचण्यांची संख्या देखील कमी झाली आहे.

 

सोमवारी दिवसभरात 356 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.  शहरात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 69 हजार 979 इतकी झाली आहे.

 

तर डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 60 हजार 145 आहे.  सध्या 416 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून 253 रुग्ण व्हेन्टिलेटरवर आहेत.

 

ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 5370 आहे. एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4464 आहे. दिवसभरात 2149 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.