पिंपरी – शहरातील करोनाबाधितांमध्ये आज (रविवारी) नव्याने 11 जणांची भर पडली आहे. यामध्ये तीन पुरुषांचा तर 8 महिलांचा समावेश आहे. आजच्या बाधितांमुळे शहरातील करोनाबाधितांचा आकडा 532 वर पोहोचला आहे.
शनिवारी चाचणीसाठी पाठविलेल्या रुग्णांच्या तपासणीचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यानुसार 11 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे रुग्ण इंदिरानगर, चिंचवड स्टेशन, रुपीनगर, पिंपरी, बौद्धनगर, वाल्हेकरवाडी व दत्तनगर येथील रहिवासी आहेत. तर 13 जण आज करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 262 इतकी झाली आहे.