माझ्यामुळेच करोनाच्या रुग्णांची संख्या ‘कमी’

मुंबई : जगभरात हाहाकार माजवलेल्या करोना व्हायरसने आता महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. पुण्यात  दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, करोनाविरोधात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चक्क घोषणा दिल्या आहेत.

दरम्यान, आठवले यांनी भारत-चीन संबंध सुदृढ राहोत असे म्हणत ‘गो करोना… गो… गो करोना… गो’ अशा घोषणा दिल्या. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

यावर आता आठवले यांनी म्हंटले आहे की, ‘मी गो करोना असं म्हटलं आहे. त्यामुळे तो महाराष्ट्र काय तर भारतामध्येही जास्त पसरलेला नाही. तरीही सरकारकडून यासंदर्भात काळजी घेतली जात आहे. आम्ही करोनाला जायला सांगितलं आहे. पण तो होऊ नये यासंदर्भातील काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. डॉक्टरांची जबाबदारी आहे. आपल्या गावामध्ये, आपल्यामध्ये करोना येता कामा नये यासाठी आपणही काळजी घेणं गरजेचं आहे,” असं मत आठवले यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.