देशात कोरोना रुग्णांचा आकडा दीड कोटींच्या पुढे

एका दिवसात 2.74 लाखापेक्षा जास्त लोक संक्रमित

नवी दिल्ली – भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत.

संक्रमणामुळे मृयू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे.

मागील चोवीस तासात देशामध्ये 2 लाख 74 हजार 944 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासोबतच 1 लाख 43 हजार 701 लोक बरे झाले असून 1620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

79.25% नवीन रुग्ण केवळ 10 राज्यात
रविवारी कोरोनाच्या 79.25% केस देशातील दहा राज्यात वाढल्या. यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रात 68,631, उत्तर प्रदेशमध्ये 30,566, दिल्लीमध्ये 25,462, कर्नाटकमध्ये 19,067, केरळमध्ये 18,257, छत्तीसगढ़मध्ये 12,345, मध्यप्रदेशमध्ये 12,248, तामिळनाडूमध्ये 10,723, राजस्थानमध्ये 10,514 आणि गुजरातमध्ये 10,340 केस आढळून आल्या. या राज्यांमध्येच सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात 503 लोकांचा मृत्यू झाला तर दिल्लीमध्ये 161 आणि उत्तरप्रदेशमध्ये 127 लोकांचा मृत्यू झाला.

कोरोना महामारीचे आकडे
1. मागील 24 तासात एकूण नवीन केस : 2.74 लाख
2. मागील 24 तासात एकूण मृत्यू : 1,620
3. मागील 24 तासात एकूण बरे झाले : 1.43 लाख
4. आतापर्यंत एकूण संक्रमित झालेले : 1.50 कोटी
5. आतापर्यंत बरे झालेले : 1.29 कोटी
6. आतपर्यंत एकूण मृत्यू : 1.78 लाख
7. सध्या उपचार सुरु असलेली एकूण संख्या : 19.23 लाख

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.