करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तिघांचे रिपोर्ट “निगेटिव्ह’

कार्ला (वार्ताहर) – वेहरगाव येथील करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तीनही व्यक्‍तींना पुणे येथे काशीबाई नवले हॉस्पिटल येथे “स्वॅब टेस्ट’साठी पाठवले होते. शनिवारी (दि. 23) त्या तीनही व्यक्‍तींचे तपासणी अहवाल “निगेटिव्ह’ आले आहेत.

एका व्यक्‍तीचा रिपोर्ट अजून प्राप्त झाला नाही. याबाबत माहिती कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. भारती पोळ व आरोग्यसेवक चंद्रकांत गवलवाड, प्रसाद बिराजदार, शिवाजी चव्हाण यांनी दिली आहे. तसेच “निगेटिव्ह’ आलेल्या तीनही व्यक्‍तींना वेहरगाव येथील आपत्ती व्यवस्थापन समिती विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी या वेळी दिली.

आता तीनही व्यक्‍तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने नागरिकांमधील भीतीचे वातावरण जरी कमी झाले असले तरीही नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने वेहरगाव, दहिवली कंटेन्मेंट झोन असल्याने या गावांच्या सीमा रेषेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.