गंगाजल घेतल्यास बरा होईल कोरोना रुग्ण

लखनौ – कोरोना ह्या साथीच्या रोगावर आजवर प्रभावी औषध सापडले नाही. सामाजिक अंतर राखणे , मास्क वापरणे हे सध्या प्रभावी ठरताना दिसत आहे. त्याचबरोबर जगभरात अनेक लसीचा वापर करण्यात येतो आहे. असे चित्र असताना कोरोना बरा करण्यासाठी नाना प्रकार करून झाले, गाईच्या शेणापासून आयुर्वेदीक काढ्यापर्यंत.

आता त्यातच भर पडली आहे ती गंगाजल पाण्याची. कोरोनावर गंगाजल हे प्रभावी ठरू शकतं, असं एका संशोधनात समोर आलं आहे. बनारस हिंदू विद्यापीठातले डॉक्टर व्ही. एन. मिश्रा आणि डॉक्टर अभिषेक पाठक यांनी याबाबत दावा केला आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा नदीच्या पाण्यात बॅक्टेरियोफेज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. बॅक्टेरियोफेजचा अर्थ ‘बॅक्टेरिया नष्ट करणारा’ असा होतो. गंगेमध्ये असलेले हे बॅक्टेरियोफेजही विविध प्रकारच्या विषाणूंना नष्ट करू शकतात. यामुळेच गंगा नदीची शुद्धता कायम राहते.

हिमालयाच्या गंगोत्रीमध्ये उगम होत असलेल्या गंगा नदीमध्ये जवळपास 1300 प्रकारचे बॅक्टेरियोफेज आढळून आले आहेत. देशातल्या कोणत्याही नदीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅक्टेरियोफेज नाहीत. विशेष म्हणजे बॅक्टेरियोफेज आपल्यासाठी हानिकारक नसतात.

यापूर्वी ‘एम्स ऋषिकेश’ने गंगा नदीच्या पाण्याची तपासणी केली होती. त्या वेळी या पाण्यात कोरोनाचे विषाणू टिकत नसल्याचं आढळून आलं होतं. ऋषिकेशपासून वाराणसीपर्यंत गंगा नदीतील पाण्याची तपासणी करण्यात आली होती.

त्यातून ही माहिती मिळाली होती. दरम्यान, कोरोनाच्या काही रुग्णांवर उपचारात बेंगळुरूच्या ‘आयआयएम’मधले निवृत्त प्राध्यापक आणि एक एनजीओ गंगाजलाचा वापर करत आहेत. या चाचणीचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.