राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69 टक्क्यांवर

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यात आज 6 हजार 711 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 58 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 68.33  टक्के एवढे झाले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज राज्यात 9,181 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 5,24,513 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 735 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

(टीप – आज नोंद झालेल्या एकूण 293 मृत्यूपैकी 221 मृत्यू हे मागील 48 तासातील  तर 57 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरीत मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू ठाणे जिल्हा-9, रत्नागिरी -2, बीड-1, जालना-1, पुणे -1 आणि पालघर 1 असे आहे. पोर्टलनुसार आकडेवारी अद्यावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.)

Leave A Reply

Your email address will not be published.