करोनाबाधिताची फरफट ! बेडसाठी केला चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर प्रवास

चंद्रपूर  – राज्यात करोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. यामुळे पुन्हा एकदा कोविड सेंटर्समधील बेडस फुल झाले आहेत. यामुळे करोनाबाधित रुग्णांना बेड मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका करोनाबाधित रुग्णाला बेडसाठी चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर असा क्‍लेशदायक प्रवास करावा लागल्याचे समोर आले आहे.

वरोरा येथील किशोर नरहरशेट्टीवार असे या रुग्णाचे नाव आहे. ते करोना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना वरोरा आणि चंद्रपूर शहरात बेड मिळाला नाही. त्यानंतर रुग्णवाहिकेने ते थेट तेलंगणा राज्यात गेले. मात्र तिथेही बेड न मिळाल्याने ते पुन्हा चंद्रपुरात परतले. या सर्व खटाटोपात 20 तासांपेक्षा जास्त वेळ निघून गेला. अखेर या सर्व क्‍लेशदायक प्रवासानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. गेल्या 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी 1010 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 14 मृत्यू झाले असून सक्रिय बाधितांची संख्या 6549 एवढी झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.