उच्चांकी 396 रुग्ण; आठ बाधितांचा मृत्यू, करोनाचे एकूण 277 बळी
सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात 396 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर आठ करोनांबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 8671 झाली असून करोनामुले आतापर्यंत 277 रुग्णांचा बळी गेला आहे.
जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 396 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 8 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात चौधरवाडी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, सासपडे ता. सातारा येथील 67 वर्षीय महिला, सदरबझार, सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, भाकरवाडी ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष या 4 करोनाबाधितांचा तसेच सातारा येथील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये गजवडी ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, गेंडामाळ येथील 73 वर्षीय पुरुष व चिमणपुरा पेठेतील 35 वर्षीय पुरुष व कराड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये बनवडी ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 करोनाबाधितांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
या करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
पाटण तालुका ः सोन्याचीवाडी 1, दिवशी बद्रुकु 2, मारुल हवेली 3, पाटण 1, हुंबरळी 1, गिरीवाडी 1, गिरेवाडी 1, शिंदेवाडी 1, मल्हारपेठ 1, तळमावले 1, ढेबेवाडी 7
कराड तालुका ः कराड शहर पोलीस 3, शुक्रवार पेठ 1, कराड 7, काले 6, मलकापूर 9, चिखली 1, पोटले 1, नांदलापूर 1, आगाशिवनगर 1, बेलवडे 1, वडगाव 1, कोनेगाव 1, वाठार 11,महिगाव 2, सायगाव 1, बुधवार पेठ 2, कोयना वसाहत 3, बनवडी 6, कुंभारगाव 1, मुंडे 3, राजमाची 1, गोवारे 2, एचडीएफसी बॅंक 2, शनिवार पेठ 5, गोळेश्वर 5, शिवाजी हाऊसिंग सोसायटी 4, विडणी नवसारे 1, उंब्रज 1, मंगळवार पेठ 7, येळगाव 14, नवसारवाडी 1, पाडळी केसे 1, गुरुवार पेठ 8, कार्वे 1, सोमवार पेठ 2, सह्याद्री हॉस्पीटल 1, शिवडे 1, मार्केट यार्ड 1, येनके, खुबी 2
सातारा तालुका ः गुरुवार पेठ 7, नुने 1, शनिवार पेठ 13, प्रतिभा हॉस्पिटल 1, पाडळी 4, सातारा 9, यादोगोपाळ पेठ 2, नांदगाव 1, मालांज 1, वर्णे 1, पीरवाडी 1, करंजे 1, बुधवार पेठ 2, कृष्णानगर 1, अतीत 2, सदरबझार 2, राधिका नर्सीग होम, शाहुपूरी 3, गडकर आळी 1, भरतगाववाडी 18, सुटकेस चौक एमआयडीसी 9, वाढे 1, धावडशी 2, मल्हारपेठ 5, दौलतनगर 1, नागठाणे 2, गोडोली 2, पुसेवाडी 2, गुजरआळी 2, विकासनगर 2, खिंडवाडी 2, लिंब 1, अंबेदरे 1, हेडक्वार्टर सातारा 8,
खटाव तालुका ः पुसेगाव 2, चोराडे 1, विसापूर 1, खातगुण 2, डिस्कळ 4, वडूज 3, विखळे 1, भोसरे 2,
फलटण तालुका ः गोखळी 8, रविवार पेठ 2 , मलटण 4, दत्तनगर 8, विडणी 2, गुणवरे 2, चौधरवाडी 2, पवारवाडी, वाठार, महतपुरा पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ,धनगरवाडा, कृषीनगर मठाचीवाडी, शुक्रवार पेठ, विडणी, ढेबेवाडी, लक्ष्मीनगर प्रत्येकी 1,
माण तालुका ः दहिवडी 2, महाबळेश्वरवाडी 5, म्हसवड 18, भालवडी 2, देवापूर, राणंद, तडवळे, वाकी वरकुटे, नरवणे प्रत्येकी 1.
कोरेगाव तालुका ः सोनके, कोरेगाव, किन्हई फाटा, सातारा रोड, पिंपोडे, कुमठे प्रत्येकी 1,
वाई तालुका ः शेंदूरजणे 2, रविवार पेठ 3, सोनगिरवाडी 2, पाचवड 2, कवठे 2, बोपर्डी, मधली आळी, पांडेवाडी, सिद्धनाथवाडी, एमआयडीसी, फुलेनगर, भुईंज, चिखली प्रत्येकी 1,
खंडाळा तालुका ः शिरवळ 2, गवाडेवाडी 5, फुलमळा, शिंदेवाडी, शेखमीरवाडी, वाडवाडी, पाडळी, पारगाव प्रत्येकी 1
महाबळेश्वर तालुका ः महाबळेश्वर 5, गवळी मोहल्ला, राजवडी प्रत्येकी 1,
घेतलेले एकूण नमुने — 38026
एकूण बाधित — 8671
घरी सोडण्यात आलेले — 4658
मृत्यू — 277
उपचारार्थ रुग्ण — 3736