देशात कोरोना आऊट ऑफ कंट्रोल; २४ तासांत चार हजाराहून अधिक बाधितांचा मृत्यू

एका दिवसात देशात 4,01,078 नवीन बाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा भयानक कहर काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून ४ लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होताना दिसून येत आहे.तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तब्बल ४ लाख १ हजार ७८ नवीन कोरोना रुग्ण आढळले तर ४ हजार १८७ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, आज नोंद झालेल्या आकडेवारीनुसार देशात संक्रमित होणाऱ्यांची एकूण संख्या 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 वर गेली आहे.

मृतांची संख्या 2 लाख 38 हजार 270 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर, कोरोनामधील सक्रिय रूग्णांची संख्या गेल्या 24 तासांत वाढून 78 हजार 282 नवीन रुग्णांवर पोहोचली आहे, त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 37 लाख 23 हजार 446 वर गेली आहे. ही आकडेवारी शुक्रवारी सकाळी आठ ते शनिवारी सकाळी आठ या वेळेत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.