नवी दिल्ली – देशभरात करोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. करोनाविरोधात लढण्यासाठी सर्वच जण आपापल्या परीने मदतनिधी देत आहे. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी आपल्या संपूर्ण एका वर्षाचे वेतन देत सर्वांसमोर आदर्श घालून दिला आहे.
बी.एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी संपूर्ण एका वर्षाचे वेतन दिले आहे. यासोबतच त्यांनी सर्व मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी आणि सामान्य नागरिकांना आपल्या क्षमतेनुसार मदत करण्याचे आवाहन केले आहे.
बी.एस. येडियुरप्पा यांनी एक व्हिडीओ ट्विट करत म्हंटले कि, सध्या कठीण काळ सुरु आहे. आपण सर्वांनी एकत्र मिळून करोनाचा सामना करण्याची गरज आहे. मी सीएमआरएफ कोविड -19साठी आपले पूर्ण एका वर्षाचे वेतन वैयक्तिक स्वरूपात देत आहे. तुम्हीही शक्य असेल तर योगदान द्या, असे त्यांनी सांगतले आहे. दरम्यान, कर्नाटकात आतापर्यंत १०१ करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.
It is a very difficult time that we are all going through. And it is important that we fight this epidemic together. Personally, I am donating my one year’s salary to the #CMRF Covid19. I request you all to contribute, however small, and help #Karnataka fight #Corona.
Thank you pic.twitter.com/15jwrk1Ixz— B.S. Yediyurappa (@BSYBJP) April 1, 2020