शिरूर : शिरूर शहराजवळील रामलिंग रोड, बाबुराव नगर ,बाफना मळा मौर्यपुरम सह शिरूर तालुक्यातील दहा गावात 17 कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. बाबुराव नगर मधील एका डॉक्टरांचा व कंपनी कामगार यांचा समावेश आहे.
शिरूर बाबुराव नगर येथील नामांकित हॉस्पिटल चे 38 वर्षीय डॉक्टर यांनाच कोरोनाची बाधा झाल्याने बाबुराव नगर व शिरूर परिसरात घबराट उडाली आहे. तर रामलिंग रोड बाबुराव नगर परिसरातील 44 वर्षीय व 23 वर्षीय कंपनी कामगारही कोरोना बाधित निघाल्याने. शिरूर शहराची या नागरिकांचा जवळचा संबंध असून यामुळे शिरूरला धोका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिरूर तालुक्यात आज करंदी 3, कारेगाव 3, रामलिंग रोड 1 ,बाबुराव नगर 1, तर्डोबावाडी 1, ढोक सांगवि 1,सणसवाडी 2 कोरेगाव भिमा 2 तळेगाव ढमढेरे 1 ,वढू बुद्रुक 1, पिंपळे जगताप 1 असे दहा गावात मिळून सतरा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शिरूर तालुका पुन्हा एकदा हादरला असून शिरूर तालुक्यातील कोरणा बाधित यांची संख्या रोज वाढत असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही साखळी तोडायची कशी हा सर्वात मोठा प्रश्न आता आरोग्य महसूल ग्रामपंचायत प्रशासनासमोर आहे. या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना क्वारटाईन करण्याचे काम सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.