मुंबई : राज्यातील सहा जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सहा जवान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) चे आहेत. त्यांना शुक्रवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
हे सर्व सैनिक मुंबई जवळील खारघर येथे तैनात होते. यापूर्वी सीआयएसएफच्या पाच जवानांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत.
दरम्यान राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 490 वर पोहचली आहे. त्यात मुंबईत 198., पुण्यात, 63,सांगलीत 25, अहमदनगरमध्ये 19, नागपुरात 12, ठाण्यात 10 कोरोनाचे रुग्ण आहेत.