लंडन दिवसांच्या विलगिकरणानंतरही दर दहा करोना संसर्गितामध्ये एक जण संसर्गक्षम असतो, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले. इंग्लंडमधील एक्सेटर विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनात हा विषाणू संसर्गित करण्याची क्षमता टिकवून आहे का?
हे तपासण्याच्या नव्याने स्वीकारलेल्या चाचण्यांचा अवलंब करण्यात आला. दर्जेदार पीसीआर चाचण्यात पॉझिटीव्ह आलेल्या 176 जणांवर हे संशोधन करण्यात आले.
काही नागरिकांत हि संसर्ग क्षमता 68 दिवस किंवा दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकते. करोना रोखण्यासाठी या चाचण्या महत्वपूर्ण ठरू शकतात, असे नमूद करण्यात आले.
आमचा हा अभ्यास तुलनेने लहान गटावर झाला आहे. पण आमचे निष्कर्ष दाखवतात की दहा दिवसांनंतरही हे विषाणू पूर्ण सक्रिय राहू शकतात. आणि ते संसर्ग पसरवू शकतात. मात्र अशा संसर्गित बाबत फारसे वैद्यकीय संशोधन झालेले नाही.
त्यामुळे असे संसर्गित कोण आहेत, याचा आपण अंदाज बांधू शकत नाही, असे एक्सेटर वैद्यकीय विद्यापीठाच्या प्रा. लोरणा हॅरिस यांनी सांगितले नव्या चाचणीत विषाणू अद्याप सक्रिय आहे की नाही आणि तो संसर्गक्षम आहे का? याची माहिती मिळते, असे त्यांनी सांगितले.