नवी दिल्ली – युनायटेड किंगडम ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर जगभरात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत अजून एक चिंताजनक बातमी खुद्द ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिली आहे. विषाणूच्या नव्या प्रकाराचा फैलाव अत्यंत वेगाने होत असल्याची माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे. ( corona new strain )
बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी जॉन्सन यांनी करोना विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत भाष्य केलं. विषाणूचा नवा प्रकार एका देशातून दुसऱ्या देशात वेगाने पसरु शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये सध्या धान्याचा मुबलक साठा आहे. साठवणूक आणि पुरवठा यंत्रणेची साखळी मजबूत असल्याचंही जॉन्सन यांनी यावेळी सांगितलं.
विषाणूच्या या नव्या प्रकारात 17 महत्वाचे बदल आहे. त्यात सर्वात मोठा आणि घातक बदल म्हणजे त्यातील स्पाईक प्रोटीन. स्पाईक प्रोटीनचा वापर हा विषाणू मानवी शरिरातील कोशिकांमध्ये घुसण्यासाठी करत असल्याचं वैज्ञानिकांचं मत आहे. ( corona new strain )
कोणती लस प्रभावी?
करोनाच्या नव्या प्रजातीवर स्पुटनिक ही लस प्रभावी ठरत असल्याचा दावा रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रिक यांनी केला आहे.
रशियातील वृत्तसंस्थेने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार व्हायरसमध्ये म्यूटेशन्स झाले असले तरी, स्पुटनिक व्ही लस नव्या करोना विषाणूविरोधात तिचा प्रभाव चांगल्या प्रकारे सिद्ध करत आहे, असे दिमित्रिक यांनी सांगितलं. ( corona new strain )
तसेच, रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड ऍझेनेका या कंपनीसोबतसुद्धा नव्या करोनाशी मुकाबला करणारी प्रभावी लस तयार करण्यावर काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.