चिंता वाढली! देशातील ब्रिटन ‘स्ट्रेन’ बाधितांची संख्या 58 वर

नवी दिल्ली – करोनाच्या ब्रिटन स्ट्रेनचे आणखी 29 बाधित असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. त्यामुळे या नव्या विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या 58 वर पोहोचली आहे.

या विषाणूमध्ये होणाऱ्या बदलाची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सकारने सार्स-कोव्ह2 जेनोमिक कन्सर्टीयम लॅबोरेटरीजची निर्मिती केली आहे. त्यातून आलेल्या अहवालातून ही बाब निष्पन्न झाली आहे. अशा स्वरूपाच्या दहा प्रयोगशाळा देशांत उभारण्यात आल्या आहेत.

या प्रयोगशांळांपैकी पुण्याच्या एनआयव्हीमध्ये पाच नमुने बाधित निघाले. बंगळुरूमध्ये 10, हैदराबादमध्ये तीन, दिल्लीत 19 आणि कोलकात्यात एक नमुना बाधित निघाला. ब्रिटनमधून आलेल्या सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली आहे.

या बधितांना राज्य सरकारतर्फे एका स्वतंत्र कक्षात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांना सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचेही विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांचे सहप्रवासी, कुटुंबियांच्या संपर्कातील व्यक्तीची शोध मोहीम राज्य सरकार राबवत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.