पुणे विभागात करोना मृत्यूदर घटेना

पुणे  -विभागात करोना बाधित संख्या 19 लाख इतकी झाली असून, त्यातील 18 लाख 30 हजार जण करोनामुक्त झाले आहेत. मागील पंधरा दिवसांत विभागातील करोनामुक्‍तीचे प्रमाण वाढल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

मात्र, मागील दोन महिन्यांपासून विभागातील मृत्युदर जैसे थे आहे. अद्याप त्यामध्ये घट झालेली नाही. पुणे विभागात सध्या 31 हजार 314 सक्रीय बाधित संख्या आहे. तर आतापर्यंत 39 हजार 138 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. दोन महिन्यांपूर्वी म्हणजे 16 जून रोजीही विभागातील मृत्युदर 2.06 टक्के इतकाच होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.