घराघरांत विषाणूची भीती; दिवसातून अनेकदा होतो बाधित झाल्याचा भास
नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यातील करोनाबाधितांचा मृत्यूदर आता जवळपास तीनशेच्या घरात पोचला आहे. त्यामुळे करोना विषाणूची भीती आता घराघरांत पोचली आहे. अगदीच सामान्य प्रकृती असलेल्या नागरिकांनाही दिवसातून अनेकदा करोनाची बाधा झाल्याचा भास होतो. किरकोळ खोकला, ताप किंवा सर्दी असली, तरी घरातच विलगीकरणात राहून अनेकजण त्रास सहन करत असल्याचे चित्र सगळीकडेच दिसते.
करोनाबाधित रुग्णसंख्येने जिल्ह्यात आता 21 हजार 472 एवढ्या रुग्णसंख्येने टप्पा गाठला आहे. त्यात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही 17 हजार 876 इतकी आहे. तथापि, बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत राहणारी तफावत कोविड रुग्णालयांमधील गर्दी वाढवित आहे. नगर जिल्ह्यात सध्या 3304 एवढे करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. सबब, शहरातील जवळपास सर्वच कोविड रिकव्हरी सेंटरही रुग्णसंख्येने भरलेले आहेत. करोना विषाणूचा त्रास सहन होत नसल्याने कोविड रुग्णालयांत दाखल होण्यासाठी करोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची केविलवानी धडपड सुरूच आहे.
शहरातील सर्वच रुग्णालये देखील आता हाऊस फुल्ल आहेत. नवीन रुग्णाला दाखल करुन घेण्यासाठी बहुतेक रुग्णालयांत बेडच शिल्लक नाहीत. परिणामी नगरकर आणि वैद्यकीय क्षेत्रासमोर नव्या अडचणी वाढत आहेत. दरम्यान, आज जिल्ह्यात 421 ने वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज तब्बल 700 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 17 हजार 876 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 83.25 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहावाजेपर्यंत रुग्णसंख्येत 421 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3304 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 207, अँटिजेन चाचणीत 65 आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 149 रुग्ण बाधित आढळले. यामध्ये मनपा 112, संगमनेर 4, राहाता 2, पाथर्डी 18, नगर ग्रामीण 11, श्रीरामपूर 1, नेवासे 1, पारनेर 1, अकोले 21, राहुरी 17, कोपरगाव 3, जामखेड 12, कर्जत 3 आणि मिलिटरी हॉस्पिटल 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 65 जण बाधित आढळून आले. यामध्ये, राहाता 1, श्रीरामपूर 3, कॅन्टोन्मेंट 10, नेवासे 21, पारनेर 4, अकोले 3, कोपरगाव 7 आणि कर्जत 16, अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 149 रुग्णांची नोंद दरम्यान, आज 700 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला