मुंबई – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतातही कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊन मुळे सतत व्यग्र असणारी कलाकार मंडळीसुद्धा चक्क त्यांच्या घराच्या व्यासपीठावर रमली आहे.
लॉकडाऊनमुळे जो वेळ उपलब्ध होतो आहे, त्याचा काही तरी चांगला उपयोग करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक सेलिब्रिटी करतो आहे. आपण काय करतो आहोत, हे आपल्या फॅन्सना सांगण्यासाठी सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओदेखील व्हायरल केले जात आहेत.
नुकतंच, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी, अभिनेत्री ‘जान्हवी कपूर’ने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने खऱ्या आयुष्याची किंमत आपल्या लक्षात आल्याचं विधान केलं. जान्हवीने जवळपास आठवडाभराचा काळ घरातच घालवला आहे.
‘कुटुंबाला आणि आपल्या घराला आपली कायमच गरज असचे हे मी जाणलं. हे मी शिकले. आपल्या माणसांसाठीच्या जबाबदाऱ्या मी शिकले. कुटुंबीयांचं स्वास्थ्य, घरातील वातावरण याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होत असतो हे मी शिकले’, असं जान्हवीने लिहिलं.
View this post on Instagram
Self isolation productivity 🌈🖼🍍 #ilovepineapple #stayhomestaysafe #fightcorona
तसंच, घड्याळाच्या काट्यावर आयुष्य जगत असताना एका दिवसात किती तास असतात याचा आपल्याला विसर पडतो, हेच वास्तव जाणत या एका दिवसात अनेक तास असल्याचं निरिक्षण जान्हवीने सर्वांपुढे ठेवलं.
इतकंच नव्हे तर, घराच्या ड्रेसिंग रुममध्ये आपल्याला आजच्या क्षणीसुद्धा आईच्या म्हणजेच श्रीदेवी यांच्या अस्तित्वाची अनुभूती होते, असं लिहित तिने या विलगीकरण काळात घराशी, घरातल्या व्यक्तींशी जोडलं गेलेलं आणि बहरलेलं सुरेख नातं सर्वांपुढे ठेवलं आहे.