342 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात शनिवारी (दि. 22) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 342 नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. त्याचबरोबर दहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, कार्वे, ता. कराड येथील 77 वर्षीय पुरुष, गोडोली, ता. सातारा येथील 59 वर्षीय महिला, मोरघर, ता. जावळी येथील 65 वर्षीय पुरुष, उडतारे, ता. वाई येथील 64 वर्षीय पुरुष व कराड येथील 72 वर्षीय पुरुष, या सहा बाधितांचा क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तरडफ, ता. फलटण येथील 81 वर्षीय पुरुष व रविवार पेठ, फलटण येथील 64 वर्षीय पुरुष या बाधितांचा फलटण उपजिल्हा रुग्णालयात, मंगळवार पेठ, सातारा येथील 87 वर्षीय महिला व तारळे, ता. पाटण येथील 78 वर्षीय महिला या बाधितांचा सातारा येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
कराड तालुक्यामध्ये कराड शहरातील रविवार पेठ सहा, उपजिल्हा रुग्णालय पाच, सोमवार पेठ पाच, शनिवार पेठ चार, गुरुवार पेठ, मंगळवार पेठ प्रत्येकी एक, शहरात अन्यत्र सहा, बनवडी सात, पाल चार, कृष्णा मेडिकल कॉलेज तीन, रेठरे बुद्रुक, मलकापूर, जुळेवाडी, उंब्रज, गोटे, कोडोली, कार्वे, रेठरे खुर्द, खुबी प्रत्येकी दोन, काले, ओंड, सुपने, कोयना वसाहत, वडगाव हवेली, काळगाव, बाहे, टेंभू, कोपर्डे, किवळ, शिवाजीनगर, वाठार खुर्द, वनवासमाची, शेरे, पोटाळे, चचेगाव, उंडाळे, ओगलेवाडी, आगाशिवनगर, विद्यानगर प्रत्येकी एक, सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात गुरुवार पेठ, सदरबझार प्रत्येकी पाच, चिमणपुरा पेठ, गोडोली प्रत्येकी तीन, रामाचा गोट, शनिवार पेठ, राधिका रोड, गोळीबार मैदान,
आदिशक्ती आर्केड प्रत्येकी दोन, यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, माची पेठ, सोमवार पेठ, मोती चौक, मल्हार पेठ, दुर्गा पेठ, कामाठीपुरा, सिव्हिल हॉस्पिटल प्रत्येकी एक,
शहरात अन्यत्र सात, गणेशवाडी सहा, शाहूपुरी चार, सासपडे तीन, नागठाणे, अपशिंगे प्रत्येकी दोन, पीरवाडी, विकासनगर, अतीत, पुसेवाडी, करंजे, कृष्णानगर, भरतगाव, बोरगाव, काशिळ, संगम माहुली, जुनी एमआयडीसी, म्हसवे, कठापूर, वडुथ, पाटखळ, शेंद्रे फाटा, समर्थनगर, चिंचणेर निंब, विलासपूर, धतमार्ली प्रत्येकी एक, खटाव तालुक्यातील खटाव एक, कोरेगाव तालुक्यातील देऊर 23, कुमठे, गुजरवाडी, कोलवडी प्रत्येकी दोन, त्रिपुटी, कोरेगाव, आर्वी, सकलवाडी, वाठार किरोली प्रत्येकी एक, फलटण तालुक्यातील मांडवखडक 14, जाधववाडी आठ, फलटण शहरात सोमवार पेठ, मलठण प्रत्येकी तीन, लक्ष्मीनगर दोन, शिवाजीनगर एक, राजुरी तीन, खामगाव एक, महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर शहर, तळदेव प्रत्येकी एक, माण तालुक्यातील दहिवडी सात, म्हसवड सहा, पळशी दोन, शिंगणापूर एक, पाटण तालुक्यात मारुल हवेली पाच, चोपदारवाडी चार, दौलतनगर, ढेबेवाडी प्रत्येकी दोन, हरपळवाडी, विहे प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यातील लोणंद दोन, शिरवळ, खंडाळा, हिराळी प्रत्येकी एक, वाई तालुक्यातील धोम सात, शेंदुरजणे पाच, वाई शहरात सोनगीरवाडी पाच, रविवार पेठ तीन, धर्मपुरी दोन, बावधन ओढा एक, दत्तनगर एक, शहरात अन्यत्र दोन, बावधन चार, वेलंग तीन, चिंधवली दोन, कवठे, खालची बेलमाची प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात कुडाळ दहा, रिटकवली पाच, बिभवी चार, कुसुंबी, मेढा प्रत्येकी दोन, गणेशवाडी एक, इतर दोन, ग्रॅंट रोड (मुंबई) पोलीस क्वार्टर, नानके, वाजवालके, मुंबई प्रत्येकी एक यांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत.