नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. काल म्हणजेच गुरुवारी एकूण 3,016 प्रकरणे नोंदवली गेली होती. यानंतर कोरोनाची रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे.
देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 15 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या 15208 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. दिल्लीमध्ये ऍक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे. त्यानुषंगाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे.
या बैठकीला आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांच्याशिवाय वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी सौरभ भारद्वाज यांनी गुरुवारी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.
220.65 कोटींहून अधिक लसीकरण करण्यात आले
आतापर्यंत देशात कोरोना लसीचे 220.65 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 102.73 कोटींहून अधिक लोकांना पहिला डोस मिळाला आहे. 95.19 कोटी पेक्षा जास्त दुसरा डोस देण्यात आला आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आजच्या आहे.