करोना संपुष्टात येणार ! कोणतंही व्हेरियंट येऊ द्या, ‘सुपर व्हॅक्सिन’ ठरणार प्रभावी

नवी दिल्ली – संपूर्ण जगाला मागील दोन वर्षांपासून करोना संसर्गाने हैराण करून सोडलं आहे. दररोज लाखोच्या संख्येने नवीन रुग्णांची भर पडत आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा करोना संसर्गामुळे जीव गेला आहे. त्यामुळे जगभरात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र करोनाचे विषाणूचे नवनवीन व्हॅरियंट डोकेदुखी ठरत आहे.

सध्या करोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. या व्हेरियंटवर करोना प्रतिबंधक लसही प्रभावी ठरत नसल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. त्यातच जगभरात करोना लस घेतल्यानंतरही करोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे करोना लस घेऊनही काही उपयोग होईल का, असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

आता काळजी करण्याची गरजच नसून करोनाच्या प्रत्येक रुपाला टक्कर देईल, अशी युनिव्हर्सल वॅक्सिन तयार होत आहे. या लशीला सुपर वॅक्सिनही (Super Corona vaccine) म्हणू शकता. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ही लस तयार केली आहे. त्यावर सध्या अभ्यास सुरू  असून कोविड-19 शिवाय करोनाच्या प्रत्येक व्हेरियंट्सवर ही लस प्रभावी ठरत आहे.

या लशीचं उंदरांवर ट्रायल करण्यात आलं. ज्या उंदरांवर या लशीचा प्रयोग करण्यात आला त्यांच्यामध्ये करोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट्स होते. ट्रायलमध्ये या लशीने अशा अँटिबॉ़डी विकसित केल्या. ज्या कित्येक स्पाइक प्रोटिनचा सामना करू शकतात. आता लवकरच या लशीचं मानवी चाचणीही केली जाणार आहे. या लसींच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास जागतिक महामारी ठरलेल्या करोना संसर्गावर मात करणे शक्य होणार आहे.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.